मनसेचा घुमजाव, पुणे स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला पाठिंबा

December 14, 2015 5:33 PM0 commentsViews:

maharashtra-navnirman-sena-mns-chief-raj-thackeray5

14 डिसेंबर : स्मार्ट सिटी योजनेला पाठिंबा देण्यावरून मनसेने अवघ्या काही दिवसांतच घुमजाव केले असून, पुणे स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला आज (सोमवारी) पाठिंबा दर्शविला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्यावर या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली होती. त्यानंतरफडणवीस यांनी राज ठाकरेंची ही मागणी मान्य केली आहे. मुख्यमंत्रींच्या आश्वासनानंतर मनसेने या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचं जाहीर केला आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचं म्हटलं होतं. तसंच हा केंद्राचा राजकीय खेळ आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर काही दिवसांपूर्वीच केली होती. महापालिकेने केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकार करू पाहत आहे, आणि त्यामुळेच मनसेचा या योजनेला विरोध आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र आज राज यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा करुन स्मार्ट सिटीला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.

स्मार्ट सिटी प्रस्तावाला मंजुरी घेण्यासाठी सोमवारी पुणे महापालिकेची पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये हा प्रस्ताव काही सुधारणांसह मंजूर होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close