स्मार्ट सिटीमुळे महापालिकेच्या अधिकारांवर गदा येणार नाही – मुख्यमंत्री

December 14, 2015 8:43 PM0 commentsViews:

Fadnavis2312

14 डिसेंबर : स्मार्ट सिटी योजनेमुळे महापालिकेच्या अधिकारांवर गदा येणार नाही, सर्व महापालिकेचे अधिकार अबाधित राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेमध्ये स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तरे दिली.

स्मार्ट सिटीसाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ कंपनी तयार करण्यात येणार असली, तरी त्यामध्ये कोणाकोणाला घ्यायचे, याचा निर्णय महापालिकांनाच घ्यायचा आहे. त्यामाध्यमातून महापालिकांचे अधिकार काढण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. लोकसहभागातून शहरांचा विकास व्हावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. जगात आतापर्यंत जिथे जिथे स्मार्ट सिटी तयार झाल्या आहेत, तेथील सर्वसामान्यांनाच त्यातून फायदा झाला. त्यांचं जीवनमान उंचावलं आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलं आहे.

दरम्यान स्मार्ट सिटी योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील, तसेच सर्वपक्षीय चर्चेची तयारीही सरकारची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शहरातील लोकांना पूर्ण क्षमतेने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी आणि अमृत अशा योजना आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होऊ शकते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close