भर रस्त्यात बस जळून खाक

December 14, 2015 10:05 PM0 commentsViews:

ठाण्यात घोडबंदर रोडवर कासारवडवली पोलीस स्टेशनसमोर एका एशियाड बसनं रस्त्यावर पेट घेतला. एसटीतल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं होतं. ही बस बोरिवलीहून घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे येत होती. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आग बस पूर्णपणे जळून गेली होती. या घटनेत कोणीही जखमी झाली नाही. जर वाहक आणि चालकाने सतर्कता दाखवली नसती तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. आता या बस ला आग का लागली याचा शोध अग्निशामक दल आणि एसटी प्रशासन घेत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close