ताडोबाजवळ कोळशाची खाण नाही

February 16, 2010 1:25 PM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारीताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाजवळ कोळशाची खाण स्थापन करण्याची विनंती केंद्र सरकारने फेटाळली आहे. अदानी कंपनीने कोळशाची खाण सुरू करण्यासाठी केंद्राकडे विनंती केली होती. ताडोबाच्या बफर झोनमध्ये प्रस्तावित असलेल्या या खाणीला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध केला होता. नुकतीच केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी ताडोबाला भेट दिली होती, तेव्हा या खाणीसंदर्भात त्यांनी सर्वसामान्यांची, पर्यावरणवाद्यांची मते जाणून घेतली होती.

close