कांदिवली दुहेरी हत्याकांड : आरोपीने दिली हत्येची कबुली

December 14, 2015 10:38 PM0 commentsViews:

14 डिसेंबर : मुंबईत कांदिवलीमध्ये झालेल्या डबल मर्डर प्रकरणी आता अतिशय महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सुप्रसिद्ध चित्रकार हेमा उपाध्यय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांची हत्या मीच केली, अशी कबुली मुख्य संशयित शिवकुमार उर्फ साधू राजभर याने दिली आहे. पण त्याने हे विद्या राजभर यांच्या सांगण्यावरून केलंय. विद्या राजभर सध्या फरार आहे. त्यामुळे हे खून का झाले, हे गूढ कायम आहे.

ÖêêËÖêê¯ÖáÖ¯ÖÖì
शनिवारी रात्री कांदिवली हे दोन मृतदेह आढळले आणि एकच खळबळ उडाली. प्रसिद्ध चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांचे हे दोन्ही मृतदेह जुहूहून एका टेंपोमधून कांदिवलीमध्ये आणण्यात आले होते. या दोघांचा का खून झाला, हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. पण या प्रकरणातला मुख्य संशयित शिवकुमार उर्फ साधू राजभर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलीये आणि त्याने खुनाची कबुली दिली आहे.

शिवकुमार उर्फ साधू राजभर आणि विद्या राजभर हे हेमा उपाध्याय यांच्यासोबत काम करायचे. त्यांनी हेमांचा खून का केला, हे अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाहीये. विद्या राजभर अजून फरार आहे. शिवकुमारकडे पोलिसांना 11 क्रेडित कार्डस् सापडले आहेत. हे सर्व कार्डस हेमाचे असल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेमा यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे. चित्रकार चिंतन उपाध्याय हे हेमांचे पती होते आणि त्यांच्याविरोधात हेमाने अश्लील चित्र काढल्याची पोलिसात तक्रारही केली होती. पण हे खून मालमत्तेच्या वादातून आणि कौटुंबिक कारणामुळे झाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close