अखेर पुणे पालिकेत स्मार्ट सिटीचा आराखडा मंजूर

December 15, 2015 8:40 AM0 commentsViews:

pune palika15 डिसेंबर : पुणे स्मार्ट सिटीचा आराखडा अखेर महापालिकेच्या मुख्य सभेत मंजूर करण्यात आला. सोमवारी दिवसभराच्या गदारोळानंतर रात्री पावणेबाराच्या सुमाराला हा आराखडा एकमतानं मंजूर करण्यात आला. पण हा आराखडा मंजूर करताना त्यात अनेक बदल करण्यात आले. स्मार्ट सिटीसाठी जी कंपनी स्थापन केली जाणार आहे त्या कंपनीचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले. कंपनीच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्तांऐवजी महापौरांची नियुक्ती करण्याची उपसूचना मंजूर करण्यात आली. तसंच कंपनीच्या संचालक मंडळात आठ नगरसेवकांचा समावेश करायलाही मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे पुण्यात स्मार्ट सिटीला शिवसेना आणि मनसेनं पाठिंबा दिलाय.

दरम्यान, शिवसेनेनं मुंबईतल्या पाठिंब्याबद्दल घूमजाव केलंय. तर मनसेचा मुंबईत स्मार्ट सिटी उभारण्याला विरोध कायम आहे. म्हणून संपूर्ण राज्यातल्या स्मार्ट सिटीजर वेगवेगळ्या पक्षांची काय भूमिका आहे, याबबात संभ्रम कायम आहे. विधिमंडळातही हा मुद्दा गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट सिटीवर सविस्तर उत्तरं दिली. स्मार्ट सिटी झाल्यावरही महापालिकेचे अधिकार अबाधित राहतील, आम्ही सर्व पक्षांशी चर्चा करू, काही त्रुटी राहिल्या तर त्या दूर करू, असं फडणवीस म्हणाले. स्मार्ट सिटीजच्या स्पर्धेत शहरांची नावं पाठवण्याची आज शेवटची तारीख आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close