अॅपलचं भारतीय बाजारापेठेत लोटांगण, 25 हजारात आता आयफोन 5एस !

December 15, 2015 8:24 AM0 commentsViews:

iphone 5s15 डिसेंबर : आपल्याने नावानेच ओळखल्या जाणार्‍या महागड्या अशा अॅपलने आता भारतीय बाजारापेठेत मात्र लोटांगण घेतलंय.  ऍपलनं आयफोन फाईव्ह एसची किंमत जवळपास अर्ध्यानं कमी केली आहे. एकेकाळी ऍपल फोन सर्वात महागडा अशी ख्याती होती. पण, भारतीय बाजारात एंड्राईड फोनच्या महामार्केटपुढे ऍपलला नमत घ्यावं लागलंय.

आयफोन फाईव्ह एस सप्टेंबर महिन्यात फाईव्ह एसची किंमत 44 हजार 500 एवढी होती. आता ती 25 हजार करण्यात आली आहे. 25 ते 30 हजारांच्या सेगमेंटमध्ये ऍपलला आपला वाटा वाढवायचा आहे. दुसरं कारण म्हणजे दिवाळीनंतर मोठा गाजावाजा करत आयफोन 6 आणि 6 एस लाँच करण्यात आले होते. पण याचा खप कमी झाल्याचं कंपनीला आढळलं. मुळात आशिया खंडात मोबाईल मार्केटसाठी भारत हे सर्वात मोठे सुपीक मार्केट आहे. या मार्केटमध्ये जर तग धरायचा असेल तर कंपनीच्या पॉलिसीने नाहीतर ग्राहकाराजाच्या मर्जीने चालावं लागतं हे बहुतेक ऍपलच्या ध्यानी आलं असावं म्हणूनच आज ऍपलवर आपल्या फोनच्या किंमतीत अर्ध्यावर आणण्याची वेळ आलीये. असो, आता सर्वसामान्य ग्राहकांना ऍपल फोनचा ‘आस्वाद’ तरी घेता येईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close