डहाकेंना साहित्य अकादमी

February 16, 2010 1:36 PM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारीवसंत आबाजी डहाके यांना आज दिल्लीत साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 'चित्रलिपी' या कवितासंग्रहासाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे होते. डहाकेंसोबत भारतातील सर्व भाषांमधील लेखक कवींचा यावेळी सन्मान करण्यात आला. कालच वीणा अलासे यांनाही अनुवादासाठीचा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

close