अजय-अतुलची गरुडझेप, फोर्ब्सच्या यादीत पटकावले 82 वे स्थान

December 15, 2015 12:01 PM0 commentsViews:

ajay atul15 डिसेंबर : मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या शीरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. अजय-अतुल यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश झाला आहे. 27.5 कोटी उत्पन्नासह या दोघांनी 82 व्या क्रमांकावर स्थान पटकावलंय.

फोर्ब्सने इंडिया सेलिब्रिटी 100 च्या यादी जाहीर केली आहे. अजय-अतुलने मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटांना संगीतबद्ध केलंय. अलीकडेच प्रदर्शित झालेला ब्रदर्स सिनेमाला अजय-अतुलने संगीत दिलंय. त्या अगोदर ‘अग्नीपथ’ हा पहिला हिंदी सिनेमा संगीतबद्ध केला होता. त्यांच्या या कार्याची फोर्ब्सने दखल घेतलीये. अजय-अतुलने ‘लयभारी’सह अनेक मराठी सिनेमा संगीतबद्ध करत मराठी रसिकांची पसंती मिळवलीये. आज फोर्ब्स यादीत स्थान पटकावत फोर्ब्सच्या यादीवर मराठी ठसा उमटावलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close