हेमा आणि हरीश भंबानींचं अपहरण करण्याचा होता कट !

December 15, 2015 1:29 PM0 commentsViews:

ÖêêËÖêê¯ÖáÖ¯ÖÖì15 डिसेंबर : मुंबईत कांदिवलीत झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी आणखी एक खुलासा झालाय. चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांचं अपहरण करण्याचा कट रचण्यात आला होता अशी कबुली आरोपी साधू राजभर याने दिली. तसंच पाच लाख रुपयांच्या वादावरुन दोघांची हत्या केली असंही त्यानं सांगितलं.

कांदिवलीमध्ये डबल मर्डर प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली. चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह एका बॉक्समध्ये टाकून नाल्यात फेकून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणातला मुख्य आरोपी विद्याधर राजभर अजूनही फरार आहे. या प्रकरणातला आणखी एक आरोपी साधू राजभर यानं गुन्हा कबूल केला. हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांची हत्या मीच केली, अशी कबुली साधू राजभर याने दिली आहे. तसंच पाच लाख रुपयांवरून चित्रकार हेमा उपाध्याय यांच्यासोबत वाद होता आणि त्यांचं अपहरण करण्याचा आधी कट होता, असं राजभर यानं सांगितलंय. पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं त्यांची हत्या केल्याचं राजभर यांनी सांगितलंय. मुख्य संशयित विद्याधर राजभर याच्या सांगण्यावरुनच हा खून केल्याचा दावाही त्यानं केलाय. विद्या सध्या फरार आहे. त्यामुळे हे खून का झाले. हे गूढ कायम आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close