‘त्या’चा जन्म रेल्वेच्या टॉयलेटमध्ये झाला, तसाच ‘तो’ ट्रॅकवर पडला आणि…

December 15, 2015 1:44 PM0 commentsViews:

15 डिसेंबर : काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती ही म्हण आपण बर्‍याचदा ऐकतो. मात्र, त्याचा प्रत्यय सोलापूर रेल्वे स्थानकावर पाहायला मिळालाय. एका महिलेने रेल्वेच्या बोगीतील टॉयलेटमध्येच बाळाला जन्म दिला. ही घटना इथेच संपत नाही तर, ते बाळ टॉयलेटमधून बाहेर पडलं, तरीही ते बचावलं.solapur_news

यशोदा गणेश वाघमारे ही अंध महिला सिध्देश्वर एक्स्प्रेसने दौंडकडे निघाली होती. मात्र सोलापूर स्टेशनवर थांबलेल्या रेल्वे बोगीतील टॉयलेटमध्ये तिची प्रसूती झाली. प्रसुती झाल्यानंतर ते बाळ टॉयलेटमधून खाली पडलं. मात्र तरीही ते अर्भक बचावलं. रेल्वेच्या
टॉयलेटमध्ये प्रसूती झाल्यानंतर बाळ रुळावर पडलं. त्यातच ट्रेन सुटली आणि त्याची जन्मदाती त्या रेल्वेने पुढे गेली. त्यानंतर त्याच
प्लॅटफॉर्मवर समोरून दुसरी ट्रेन येत होती. परंतु जागरूक नागरिकांच्या आणि रेल्वे कर्मचार्‍यांच्या मदतीने समोरून येणारी ट्रेन थांबविल्याने बाळाचा जीव पुन्हा एकदा बचावला.

रेल्वे थांबलेली असताना दोन बोगीमधून कुणी तरी बाळाला फेकून दिले असेल अशी चर्चा होती. मात्र रेल्वेविभागाकडून सिद्धेश्वर एक्स्प्रेसची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार रेल्वे कर्मचार्‍यानी तपासणी केल्यावर त्या बाळाच्या मातेला कुर्डूवाडी येथे उतरवून घेण्यात आले. दरम्यान, सध्या या बाळावर आणि त्याच्या अंध मातेवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण या नाळही न निघालेल्या बाळाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. मात्र एक प्रश्नाचे कोडे अद्यापही उलगडायला तयार नाही ते म्हणजे बाळ पडल्यानंतरही त्या मातेने त्याबाबत कोणतीही वाच्यता का केली नाही?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close