‘अल अलामी’ने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली

February 16, 2010 2:30 PM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारीपुणे बॉम्बस्फोटाची जबाबदारी पाकिस्तानातील 'लष्कर ए तोयबा'च्या 'अल अलामी' या संघटनेने स्वीकारल्याची बातमी 'द हिंदू' या वृत्तपत्राने दिली आहे. अबू जिंदाल नावाच्या इसमाने 'हिंदू'च्या इस्लामाबादमधील करस्पॉंडंटला फोन करुन ही माहिती दिली. अबू जिंदाल याने आपण लष्कर ए तोयबाचे प्रवक्ते असल्याचेही सांगितले आहे. अल अलामी हा 'लष्कर'मधून फुटून निघालेला ग्रुप आहे.भारत, पाकिस्तानला धमकी'द हिंदू'च्या वेबसाईटवर याविषयी माहिती देण्यात आली आहे. 'जो भी अमेरिका का इत्तेहाद होगा, हम उसके खिलाफ जंग लडेंगे। चाहे वो इंडिया हो या पाकिस्तान…' असे या दहशतवाद्याने म्हटल्याचा वेबसाईटवर उल्लेख करण्यात आला आहे.निरुपमा यांची माहितीज्यांना हा फोन आला त्या 'द हिंदू'च्या करस्पाँडंट निरुपमा सुब्रहमण्यम 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना म्हणाल्या, 'अबू जिंदाल असे नाव सांगणार्‍या माणसाने माझ्या मोबाईलवर फोन केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार्‍या चर्चेत काश्मिरच्या मुद्द्याचा समावेश नाही. तसेच फक्त भारतच नव्हे तर पाकिस्तान आणि इतर कोणत्याही अमेरिकेशी संबंध ठेवणार्‍या देशाविरोधात आमची लढाई असेल. लष्कर ए तोयबा आयएसआयचे आदेश पाळतो. आम्हाला ते पटत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो आहोत.'आलेल्या नंबरवर पुन्हा फोन केला असता हा नंबर सध्या वापरात नसल्याचा रेकॉर्डेड आवाज ऐकू आला. तसेच तो नंबर वजिरीस्तानमधील असल्याचे मोबाईलवर रेकॉर्ड झाल्याचेही निरुपमा यांनी नमूद केले. तसेच हा कॉल अधिकृत आहे किंवा नाही हे मला सांगता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

close