कुंचल्यातून अवतरले निसर्ग

December 15, 2015 2:39 PM0 commentsViews:

15 डिसेंबर : मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार राकेश अग्रवाल यांचं सोलो वॉटर कलर पेंटिंगचं प्रदर्शन कालपासून सुरू झालं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या हस्ते झालं. अग्रवाल यांनी वॉटर कलरमध्ये वेगवेगळी सुंदर निसर्गचित्रं रेखाटली आहेत. ए वॉक थ्रु नेचर असं या प्रदर्शनाचं नाव आहे. विशेष म्हणजे अग्रवाल हे एक आयएएस अधिकारी असून मध्य प्रदेशमध्ये ते सध्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरी या पदावर कार्यरत आहे. हे प्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 या वेळात सुरू असणार आहे. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close