‘दिलवाले’वर बहिष्कार पक्षाची अधिकृत भूमिका नाही – राज ठाकरे

December 15, 2015 3:14 PM0 commentsViews:

MNS on DILWALE

15 डिसेंबर : शाहरुखच्या ‘दिलवाले’ या चित्रपटावर बहिष्कार टाका, असं जे आवाहन केलं जात आहे, ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शाहरुखला चेन्नईतल्या पूरग्रस्तांना मदत करावीशी वाटली, पण इथल्या शेतकर्‍यांना त्यानं मदत केली नाही, म्हणून दिलवालेवर बहिष्कार टाका, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र ही पक्षाची भूमिका नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

शाहरुखने चेन्नई पूरग्रस्तांना 1 कोटींची मदत केली, पण तो महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना विसरला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने त्यांचा केलेला निषेध हा योग्य आहे. मात्र, त्याच्या चित्रपटावरील बहिष्कार टाकण्याचे करण्यात आलेले आवाहन पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

तसंच महाराष्ट्रात यायचं, मोठं व्हायचं, नाव कमवायचं आणि मग महाराष्ट्रालाच विसरायचं हे योग्य नाही. ही जाण त्यांनी ठेवली पाहिजे, असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

शाहरुख आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेला ‘दिलवाले’ हा चित्रपट येत्या 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close