आयपीएलबाबत शिवसेनेची माघार

February 16, 2010 5:14 PM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारीऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होणार्‍या हल्ल्यांच्या निषेधार्थ शिवसेनेने भारतात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बंदी घालण्याचा इशारा दिला होता. मात्र, आता शिवसेनेने आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या खेळण्याबाबत यू टर्न घेतला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपला विरोध राहणार नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. आज सकाळीच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व खेळाडूंना संरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. आणि आयपीएलच्या मॅचेस मुंबईतच होतील, असेही त्यांनी ठणकावले होते.याविषयीच्या भूमिकेबाबत शिवसेनेने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात हिंदुस्थानी बांधवांवर ऑस्ट्रेलियात हल्ले होतात, त्यांच्यासाठी आमचा विरोध होता. आता तेच म्हणतात, तुमचा विरोध नको, कारण आम्हाला त्याचा त्रास होईल. मग विरोध का करावा? कोणालाच या विषयाबद्दल काहीच आस्था नसेल तर आम्ही आणि आमच्या शिवसैनिकांनी त्यात का पडायचं? येऊ दे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना…या शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उपहासात्मक मत मांडलेआहे.

close