शरद जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

December 15, 2015 4:19 PM0 commentsViews:

Akhercha salam

15 डिसेंबर : शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि शेतकर्‍यांचे कैवारी शरद जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीनच्या सुमारास वैंकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानोकोपर्‍यातून त्यांचे हजारो शेतकर्‍यांनी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तर राजकीय नेतेही या शेतकरी योद्धयाच्या अखेरच्या प्रवास सहभागी झाले होते.

त्यापर्वी शरद जोशी यांचे पार्थिव आज (मंगळवारी) सकाळी नदीपात्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे अनेक शेतकर्‍यांनी शरद जोशी यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा भिडे पूल इथून सुरू होऊन लक्ष्मी रस्त्याने अलका-टिळक चौकमार्गे तीनच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचली. तिथे पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी सर्वांनी ‘शरद जोशी अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. श्रेया शहाणे आणि डॉ. गौरी जोशी या शरद जोशी यांच्या दोन्ही कन्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होत्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनीही या योद्‌ध्याचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, शेतकर्‍यांचे नेते रघुनाथ पाटील, पाशा पटेल यावेळी उपस्थित होते. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याचा पाहून अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या. याप्रसंगी महिला कार्यकर्त्यांही मोठया संख्येने उपस्थित होत्या.

शरद जोशी यांचे गेल्या शनिवारी दीर्घ आजाराने बोपोडी इेथल्या निवासस्थानी निधन झाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close