महाधिवक्ता श्रीहरी अणेंविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव फेटाळला

December 15, 2015 5:16 PM0 commentsViews:

Aney123

15 डिसेंबर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव आज फेटाळण्यात आला आहे. वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या सदस्यांनी अणेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. पण हा प्रस्ताव आज सभागृहासमोर येताच अध्यक्षांनी तो फेटाळून लावला.

हा प्रस्ताव फेटाळून लावताना सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनीही निवेदन दिलं. सरकारच्या या कृतीविरोधात शिवसेनेनं अणेंविरोधात सभागृहात आणि विधानभवनाबाहेर निदर्शनंही केली.

जोपर्यंत अणे पदाचा राजीनामा देत नाहीत किंवा आपल्या वक्तव्य मागे घेऊन माफी मागत नाहीत तोपर्यंत शिवसेना निदर्शनं सुरुच ठेवणार, या भूमिकेवर शिवसेना नेते ठाम आहेत. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत मत व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close