मुंबई महापालिकेत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर

December 15, 2015 7:14 PM0 commentsViews:

BMC56y

15 डिसेंबर : मुंबई स्मार्ट सिटी संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मनसे-भाजपच्या सहमतीने आणि शिवसेनेच्या सशर्त पाठिंब्याने स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली.

सभागृहात शिवसेना आणि मनसेने स्मार्ट सिटीसंदर्भातल्या उपसूचना मांडल्या. या उपसूचनांना मनसे आणि भाजपने पाठिंबा दिला, तर शिवसेनेच्या उपसूचना मान्य झाल्या तरच पाठिंबा दिला जाईल, अन्यथा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने विरोध दर्शवला आहे. तर राष्ट्रवादीने मात्र स्मार्ट सिटीबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. या सगळ्या गोंधळात स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी विभाग निवडण्याचा अधिकार महापालिकेला असावा, स्मार्ट सिटी अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध होतील त्यांपैकी 80 टक्के रोजगार स्थानिक भूमीपुत्रांना दिला जावा, खाजगी संघटना, उद्योजक या योजनेत सहभागी केले जाऊ नये अशा काही अटी शिवसेनेकडून ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व सूचनांना भाजप, मनसेनं पाठिंबा दर्शवला. त्यामुळे शिवसेनेने प्रस्तावाला सशर्त पाठिंबा दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close