डॉ. लागू, उमप यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

February 16, 2010 5:26 PM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारीयंदाचे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. जसराज, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि ज्येष्ठ नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांना अकादमीचा रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कर्नाटकी संगीतकार लालगुडी जयरामन, नाट्यकर्मी कमलेश दत्त त्रिपाठी आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी अमोणकर यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. शिवाय लोकशाहीर विठ्ठल उमप यांचाही हा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. तसेच नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी शं. ना. नवरे यांचाही हा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. प्रत्येकी तीन लाख रुपये रोख, ताम्रपट आणि अंगवस्त्रम अशा या पुरस्काराचे स्वरुप आहे.

close