पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी स्वस्त

December 15, 2015 9:49 PM0 commentsViews:

petrol_price_hike

15 डिसेंबर : राज्यात इंधनाचे दर पुन्हा कमी झाले आहेत. पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 46 पैशांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमत 11 वर्षांच्या निचांकी पातळीवर जाऊन पोहचल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. तेलाचे कमी झालेले दर त्याच पातळीवर कायम राहिले तर आयात मूल्य खूपच कमी होईल. परिणामी भारतीय कंपन्यांना आणखी दरकपात करणे शक्य होणार आहे.

यापूर्वी 31 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरात 58 पैसे तर डिझेलच्या दरात 25 पैशांची कपात करण्यात आली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close