नागपुरात कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मोर्चावर पोलिसांचा अमानुष लाठीमार

December 16, 2015 1:25 PM0 commentsViews:

nagpur_lathicharg16 डिसेंबर : नागपुरातल्या विधानभवनातील कंत्राटी कर्मचार्‍याच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला.या लाठीमारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नागपूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने नागपूर विधानभवनावर मोर्चाचे आयोजन केले होते. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातून आलेले आंदोलक आपल्या मागण्यांसाठी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन करत होते. यात साधारण 25 ते 30 हजार संगणक परिचालकांचा समावेश होता. डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या संग्राम योजनेतून या संगणक परिचालकांची नियुक्ती प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालयात करण्यात आली होती. मात्र 2011 पासून आजपर्यंत 8000 रूपये वेतन कबूल करूनही त्यांना जेमतेम 3500 रूपये वेतन मिळत होतं. या योजनेची अंमलबजावणी करणार्‍या महाऑनलाईन या कंपनीची मुदत येत्या 31 डिसेंबरला संपुष्टात येतीये.त्यामुळे आपल्याला नोकरीची निश्चिती मिळावी, पदनिश्चिती करण्यात यावी आणि किमात 15,000 वेतन मिळावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यात 8000 महिला संगणक परिचालकांचा समावेश होता. मोर्चाचं आक्रमक रूप पाहून मोर्चा नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. लाठीचार्ज दरम्यान अनेकजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close