पंतप्रधान कार्यालयाला महाराष्ट्राचं वावडं, चित्ररथ नाकारला

December 16, 2015 1:35 PM0 commentsViews:

maharashtra chitrarath16 डिसेंबर : गेल्यावर्षी पहिला क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्राला यंदा मात्र 26 जानेवारीच्या परेडमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारण्यात आलाय.पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्राचा चित्ररथला परवानगी नाकारली आहे.

यंदा पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयानं संकल्पना देण्याचं ठरवलं आहे. तर राज्यानं जागरण गोंधळाची थीम दिली होती. पण पंतप्रधान कार्यालयाने स्वता: हस्तक्षेप करत थीम देण्याचा निर्णय घेतलाय. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालय एखाद्या राज्याला थीम देत आहे.पण महाराष्ट्राला कोणतीच थीम दिली गेली नाही. या आधी संरक्षण मंत्रालय याबद्दलचे निर्णय घेत असतं. पण, यंदा पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाने सर्व सूत्र आपल्या हाती घेतलीये. एवढंच नाहीतर महाराष्ट्राला नकार देताना ‘तुम्ही सातत्याने सहभागी होता, यंदा इतर राज्यांना सहभागी होऊ द्या’ असं तोंडदेखलं कारण दिलं गेलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close