सर्वच उत्सवांवर आवाजाची मर्यादा, हायकोर्टाचा आदेश

December 16, 2015 2:19 PM0 commentsViews:

court on festival16 डिसेंबर : ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी हायकोर्टाने सर्वच उत्सवांवर आवाजाची मर्यादा घालण्याचा निर्णय दिलाय. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीतील ध्वनिप्रदूषणच नव्हे, तर गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणार्‍या स्वागतयात्रा, सत्यनारायणादरम्यान होणारे विविध कार्यक्रम आणि अन्य मिरवणुकांमधील आवाजाची पातळीही यापुढे मोजली जाणार आहे.

ध्वनिप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आपले आदेश केवळ तीन सणांपुरतेच मर्यादित नाहीत, तर ते या सगळ्यांनाही लागू आहेत, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता उत्सवाच्या नावाखाली सुरू असलेल्या गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव आणि दिवाळीत ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यास सांगण्यात आलंय. मात्र, नवरात्रोत्सव आणि दिवाळीत ध्वनिप्रदूषण झालेच नाही, असा अविश्वसनीय दावा सरकारने केला. प्रत्यक्षात ध्वनिप्रदूषण झाले की, नाही हे मोजण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दोन्ही सणांदरम्यान आवाजाची पातळी मोजलीच नाही, हे मंगळवारच्या सुनावणीत खुद्द पोलीस अधिकार्‍यांनीच उघड केले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close