पानसरे कुटुंबीयांना मदत

February 17, 2010 10:46 AM0 commentsViews: 10

17 फेब्रुवारी पुण्यातील बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेला रिक्षाचालक शंकर पानसरे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेसकडून आज मदत देण्यात आली. पानसरे कुटुंबीयांना 1 लाख रुपयांचा धनादेश पुण्यात देण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शंकर पानसरे यांचा भाऊ बाबा पानसरे यांना हा मदतीचा चेक दिला.मूळचे भोर येथील रहिवासी असणारे शंकर पानसरे रिक्षा घेऊन कोरेगाव पार्कमधील बेकरीसमोरून जात होते. त्याचवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला. शंकर यांच्यामागे पत्नी, 4 वर्षांचा मुलगा आणि छोटी मुलगी आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या पानसरे कुटुंबात शंकरच कमावते होते. त्यामुळे या कुटुंबाला मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.मृतांची संख्या 11पुणे बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या अजून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 11 वर गेली आहे. आदित्य मेहता या 21 वर्षाच्या तरुणाचा काल रात्री जहांगीर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आदित्य मूळचा दिल्लीचा राहणारा असून तो भारती विद्यापीठात इंजीनियरींग शिकत होता. दरम्यान पुणे बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 'पीस रॅली' काढली.

close