आठवणीतला लक्ष्या

December 16, 2015 2:44 PM0 commentsViews:

अभिनयाचा बादशहा समजल्या जाणार्‍या लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज पुण्यतिथी…आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवलं. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले. लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका, अशी ही बनवाबनवी आणि थरथराट हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन, बेटा आणि हम आपके है कौन इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले.अशा हा लाडक्या लक्ष्याला भावपूर्ण श्रद्धांजली…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close