आमीरचा राजीनामा

February 17, 2010 10:58 AM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी बॉलिवूड अभिनेता आमीर खानने कॉपी राईट ऍक्ट कमिटीचा राजीनामा दिला आहे. कपिल सिब्बल यांच्यासह बोनी कपूर, जावेद अख्तर, भूषण कुमार, विशाल भारद्वाज, मधू, मुकेश भट्ट, प्रसून जोशी आणि आमीर खान यांच्या उपस्थितीत 4 जानेवारीला या कमिटीची स्थापना झाली होती."काही लोकांनी मीडियासमोर माझ्याबद्दल चुकीची मते मांडली आहेत. पैसे कमावणे हा माझा एकमेव उद्देश कधीच नव्हता. असे असते तर मी वर्षाला एकापेक्षा अधिक चित्रपट केले असते आणि अधिक श्रीमंत झालो असतो. या सगळ्या चर्चेमुळे कॉपीराईटचा मूळ प्रश्न बाजूला पडत आहे", असे आमीरने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. आमीर खान आणि जावेद अख्तर यांच्यात वाद असल्याची चर्चा आहे. ज्यात जावेद अख्तर यांनी आमीर खानवर टीका केली होती.

close