IBN लोकमतचा दणका, यापुढे पर्ससीन मासेमारीचे परवाने बंद

December 16, 2015 4:18 PM0 commentsViews:

machimar show16 डिसेंबर : कोकणातले पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यातल्या संघर्षाबाबत आयबीएन लोकमतने मंगळवारी दाखवलेल्या स्पेशल रिपोर्टची दखल राज्य सरकारने तातडीने घेतली आहे. राज्यात यापुढे पर्ससीन जाळ्यांनी मासेमारी करण्यास नवे परवाने देण्यात येणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा मत्स्योद्योग मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसंच राज्याच्या मासेमारी धोरणासंबंधीचा डॉ. सोमवंशी समितीचा अहवालही स्वीकारला जाणार असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलंय.

आयबीएन लोकमतने काल मंगळवारी कोकण किनारपट्टीवर सध्या सुरू असलेल्या पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांच्या संघर्षाबाबतचा विशेष रिपोर्ट दाखवला होता. त्यावरून शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला एकनाथ खडसे यानी उत्तर दिलंय.

यामुळे राज्यातल्या पारंपरिक मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या परराज्यातल्या मच्छीमारांविरोधात केंद्र सरकारची परवानगी घेऊन एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठीही पावलं उचलली जाणार असल्याचं खडसे यानी या उत्तरात म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close