भाजपची राष्ट्रीय बैठक सुरू

February 17, 2010 11:04 AM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आजपासून इंदूरमध्ये सुरूवात झाली आहे. नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे.संघाच्या आदेशानुसार भाजपच्या युवा नेत्यांकडे भाजपची सूत्रे आल्यानंतर ही बैठक होत आहे. त्यामुळे भाजप काय नवी भूमिका घेतो याकडे राजकीय निरिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. 5 हजार प्रतिनिधीज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, राजनाथ सिंग, मुरलीमनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरूण जेटली यांच्यासह देशभरातले 5 हजार प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत.लोकसभा निवडणुकीतील पराभव झाल्यानंतर आता पुढच्या व्युहरचनेबद्दल या अधिवेशनात चर्चा होईल. साधी राहणी…भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पंचतारांकीत संस्कृती सोडून साधेपणाचा नारा दिला आहे. हे लक्षात घेऊन या अधिवेशनात 5 हजार आमंत्रित सदस्यांची राहण्याची सोय तंबूत करण्यात आली आहे. पण वरिष्ठ नेत्यांसाठीच्या 20 व्हीआयपी तंबूमध्ये एसीही बसवण्यात आले आहेत. तसेच अधिवेशनासाठी कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

close