कोथरुडमध्ये सिलेंडर स्फोटामुळे आग, 5 जणांचा मृत्यू

December 16, 2015 7:36 PM0 commentsViews:

kotharud fire16 डिसेंबर : पुण्यातील कोथरुड परिसरात भीषण अग्नितांडव घडलंय. कोथरुडमधील डाव्या भुसारी कॉलनीत शेडला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. आगीनंतर 3 सिलेंडरचा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सहाच्या सुमारास डाव्या भुसारी कॉलनीत मयुरेश डायनिंग हॉलशेजारच्या शेडमध्ये ही आग लागली होती. या शेडचं बांधकाम सुरू असतांना वेल्डिंगचं काम सुरू होतं त्यावेळी आगेचा भडका उडाला. शेडला आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत 3 ते 4 जणांचा जीव वाचवला. पण, सिलेंडर स्फोटामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. हा स्फोट इतक भयानक होता की, तिघांचा जळून कोळसा झालाय. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा अनधिकृत असल्याची माहिती मिळतेय. या शेडमध्ये एक गादीचा कारखाना सुरू होता. त्यामुळे आग भडकली. हा कारखानाही अनधिकृत असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. सध्या आग आटोक्यात आलीये. 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close