फसवणारे 68 शिक्षक पोलिसांसमोर

February 17, 2010 11:27 AM0 commentsViews: 3

17 फेब्रुवारी खोटी जात प्रमाणपत्रे सादर करून फसवणूक करणारे अकोल्यातील 68 शिक्षक आज अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या उर्दू शिक्षकांच्या भरतीत घोटाळा झाल्याची घटना 'आयबीएन-लोकमत'ने उघडकीस आणली होती. सामाजिक संस्थांच्या तक्रारीनंतर या शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण दोषी शिक्षक आणि संबंधीत अधिकारी फरार झाल्याने कोणालाही अटक झाली नव्हती. या शिक्षकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर अखेर आज 68 शिक्षक पोलिसांपुढे हजर झाले. याप्रकरणी दोषी असणारे 5 उपशिक्षणाधिकारी अजूनही फरार आहेत. तसेच, दोषी शिक्षकांना खोटी जात प्रमाणपत्रे तयार करून देणारे जात पडताळणी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

close