लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलून बघा, कोर्टाची सरकारला सुचना

December 16, 2015 9:37 PM0 commentsViews:

gvf655mumbai_local16 डिसेंबर : लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सकाळच्या वेळी कार्यालयांचा वेळा बदलून बघा, जर फरक पडला तर अंमलबजावणी करा अशी सुचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिलीय.

मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनचा सकाळचा वेळ म्हणजे जीवघेणी कसरतच. तुफान अशा गर्दीत जीव मुठीत धरून मुंबईकर ऑफिस गाठत असतो. अशाच गर्दीत डोंबिवलीचा भावशे लकाते या तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने दखल घेत समिती स्थापन केलीये. वेगवेगळे उपाय सुचवले जात आहे. यावर आज (बुधवारी) मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला एक सूचना केली. खासगी आणि सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलून बघा, यानं गर्दी कमी होत असेल, तर त्याची कायमस्वरुपी अंमलबजावणी करायला हरकत नाही, असं कोर्टाने सांगितलंय. याचा अर्थ उदाहरणार्थ खासगी कार्यालयांची वेळ सकाळी 9 वाजता केली, आणि सरकारी कार्यालयांची वेळ साडे दहा केली, तर सगळेच चाकरमानी एकाच वेळा प्रवास करणार नाहीत, आणि त्यामुळे गर्दी कमी होईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close