मुंबई विमानतळावर विमानाच्या पंख्यात अडकून कर्मचार्‍याचा मृत्यू

December 17, 2015 8:24 AM0 commentsViews:

 mumbai airport17 डिसेंबर : मुंबई विमानतळावर एक विचित्र आणि भीषण अपघात झालाय. कर्मचारी विमानाच्या इंजिनमध्ये ओढला गेला आणि झालेल्या अपघातात या कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.

एआय-619 हे विमान मुंबईहून हैदराबादला निघालं होतं. रनवेवर जाण्याची प्रक्रिया सुरू असताना विमानाला जेव्हा मागे ढकलण्यात येत होतं, तेव्हा ही घटना घडली. या कर्मचार्‍याचा मृतदेह इतक्या वाईट परिस्थित आहे की त्याचं पोस्टमॉर्टमही होऊ शकणार नाही. डीजीसीएनं या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या विमानाचे पायलट आणि टॅरमॅकवर असणार्‍या कर्मचार्‍यांचीही चौकशी होणार आहे. विमानाचं मुख्य इंजिन हे पंखाखाली असतं, आणि विमान जेव्हा रनवेजवळ जातं, तेव्हा हे इंजिन पूर्ण ताकदीनं सुरू असतं, आणि तेव्हा त्याच्या जवळ कुणी गेलं, तर ते इंजिन त्याला आत खेचून घेतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close