कुदळवाडीत बॉम्बस्फोटाचा निषेध

February 17, 2010 11:36 AM0 commentsViews: 5

17 फेब्रुवारी पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटातील एका संशयिताला कुदळवाडी-चिखली परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी कुदळवाडी परिसरातील गावकर्‍यांनी आज मोर्चा काढला. तसेच गावात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करणार्‍या परप्रांतीयांची ओळखपरेड घेण्यात यावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.तसेच हे व्यवसायिक मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांमध्ये गुंतल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

close