कोयनेचं पाणी मुंबईला मिळणार, 250 किमीची पाईपलाईन टाकण्यात येणार

December 17, 2015 9:36 AM0 commentsViews:

koyana dam17 डिसेंबर : कोयना धरणातल्या वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून थेट समुद्रात वाया जाणारं साधारण 68 टीएमसी पाणी मुंबई आणि नवी मुंबईला मिळणार आहे. राष्ट्रीय पाणी विकास प्राधिकरणाने यासंदर्भातला अहवाल तयार केला आहे. यासाठी अडीचशे किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च आहे बारा हजार कोटी रुपये आहे.

या योजनेला केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी सप्टेंबर महिन्यातच तत्त्वत: मान्यता दिली होती. कोयना धरणातील वाया जाणार्‍या या पाण्याचा फायदा मुंबई आणि आसपासच्या परिसराला होऊ शकतो. या पाण्यामुळे एमएमआरडीए क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न दीर्घकाळसाठी सुटू शकतो असं सांगितलं जातंय. प्रश्न एवढाच आहे की करोडो रुपये खर्च करुन बांधली जाणारी पाईपलाईन मुंबईऐवजी कोकण किंवा मराठवाड्यात वळवता आली नसती का, यावरही सरकारनं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close