कोल्हापुरात ऑनर किलिंग ?, सख्ख्या भावानेच केली बहिण आणि तिच्या पतीची हत्या

December 17, 2015 11:36 AM0 commentsViews:

kolhapur news17 डिसेंबर : कोल्हापुरातील इंद्रजीत आणि मेघा कुलकर्णी खून प्रकरणाचं गूढ अखेर उलगडलंय. मेघाच्या दोन्ही सख्ख्या भावाने त्यांचा खून केल्याचं उघड झालंय. अवघ्या चार तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. गणेश पाटील, जयदीप पाटील आणि नितीन काशीद अशी या आरोपींची नावं आहेत. आरोपींनीच दोघांची हत्या केल्याची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. मात्र, हे प्रकरण ऑनर किलिंग असल्याचं संशय बळावलाय.

कोल्हापूरमधे कसबा बावडा इथं गणेश कॉलनीत रात्री इंद्रजीत आणि मेघा कुलकर्णी याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. धारदार शस्त्राने वार करून मारेकरी हे पसार झालेत. बावडा भागातल्या प्रकाश माधव यांच्या घरी हे दाम्पत्य भाड्याने राहत होते. दोघेही खासगी ठिकाणी नोकरी करायचे. दोघांनी घरच्यांचा विरोध असताना प्रेम विवाह केला होता. त्यामुळे कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. इंद्रजीत कुलकर्णी हा मुळचा पन्हाळा तालुक्यातील सातवे सावर्डे गावचा आहे. तर पत्नी मेघा ही शाहुवाडी तालुक्यातील थेरगावची आहे. आरोपी गणेश पाटील, जयदीप पाटील आणि नितीन काशीद यानी दुचाकीवर येऊन दोघांना निर्घृण हत्या केल्याचं कबूल केलंय. प्रेम विवाहाला विरोध होता म्हणून हे हत्याकांड घडलं की या मागे आणखी काही कारण आहे याबद्दल पोलीस अधिक चौकशी करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close