कल्याणमध्ये परदेशी पाहुणे

December 17, 2015 1:12 PM0 commentsViews:

17 डिसेंबर :  कल्याण शहरातील खाडी किनार्‍यांवर परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. हे परदेशी पाहुणे आहेत ब्लॅक हेडेड सिगल्स पक्षी…हे पाहुणे आलेत हजारो किलोमीटर लांबून थेट युरोप आणि उत्तर आशिया मधून…प्रामुख्याने युरोपात आढळणारे हे ब्लॅक हेडेड सिगल्स हजारो किलोमीटरचा प्रवास पार करून आलेत. सिगल्स राहत असलेल्या भागात कड्याक्याची थंडी पडली की ते आपला मुक्काम इथं
हलवतात. सिगल्सला कल्याणच्या खाडीत राहण्यासाठी पोषक अस वातावरण असल्यानं थंडी संपेपर्यंत तरी इथंच राहणार आहेत आणि नंतर त्यांचा मेटिंग काळ संपला की परतीच्या प्रवासाला लागतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close