श्रीहरी अणेंवरून पुन्हा विधानसभेत गदारोळ

December 17, 2015 3:16 PM0 commentsViews:

Ane121

17 डिसेंबर :  राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री आगोदर विधान परिषदेत निवेदन कसं केलं, या मुद्द्यावरून शिवसेनेच्या खासदारांनी विधानसभेत गदारोळ केला.

श्रीहरी आणे वर मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत निवेदन केलं पण विधानसभेत अजूनही निवेदन केलं नाही. मुख्यमंत्र्यांचं हे वागणं प्रथेला धरुन नसल्याचं सांगत शिवसेना आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी आगोदर विधानसभेत निवेदन करायला हवं होतं, असं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे.

श्रीहरी अणे यांनी एका खासगी कार्यक्रमात वेगळ्या विदर्भ राज्याबद्दल मत व्यक्त केलं असून, त्यांनी महाधिवक्ता म्हणून कुठलीही भूमिका मांडलेली नाही, असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलं होतं. या विषयावरूणच शिवसेनेच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. या गदारोळानंतर अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close