शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

December 17, 2015 6:38 PM0 commentsViews:

dsaasdasd

17 डिसेंबर : शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत नागपूर विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शनं केली. नागपूर विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून राष्ट्रवादीचे नेत्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

शेतकर्‍यांचे कर्जमाफ करण्याची विरोधकांची मागणी फडणवीस सरकारने फेटाळून लावल्याने विरोधक संतापले. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि पक्षाचे इतर महत्त्वाचे नेत्यांनी सहभाग घेत विधानभवनाबाहेर घोषणाबाजी केली आणि राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यापुढेही साकडं घातलं.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची मागणी या आधीही विरोधकांनी आक्रमकपणे मांडली होती. पण कर्जमाफीची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना स्वबळावर उभे करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या. मात्र, सरकारने ज्या उपाययोजना केल्या आहेत त्याचा शेतकर्‍यांना लाभ मिळण्यास भरपूर वेळ लागेल. तोपर्यंत त्यांना दिलासा मिळायला हवा. शेतकर्‍यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीचे नेते आंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या या आक्रमक भूमिकेमुळे सरकारसमोर कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close