घर खरेदी करणार्‍यांना दिलासा! रेडी रेकनरचे दर स्थिर राहण्याची शक्यता

December 17, 2015 9:54 PM0 commentsViews:

sadasdas

17 डिसेंबर : घर खरेदी करण्याच्या तयारीत असणार्‍यांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदा रेडी रेकनरचे दर वाढणार नसल्याची माहिती असून त्यामुळे घरांच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. यापुढे 500 स्क्वेअर फुट पर्यंतच्या घरांना रेडी रेकनरच्या दरात वाढ होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र घरांच्या वाढत्या किमती आणि गृहकर्जाचे व्याजदर यामुळे अनेकांसाठी स्वतःचं घर विकत घेणं ही डोकेदुखी ठरते. मात्र यावेळी रेडी रेकनरचे दर स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पर्यायाने मुंबईसह महाराष्ट्रात घराच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीयांना घराच्या किंमती परवडाव्या यासाठी हा निर्णय होण्याची शक्यता आहे. पण अलिशान घरांसाठी रेडी रेकनरच्या दरात वाढ होणार असल्याचं सूत्रांनी दिली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दर निश्चित होणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

घरांच्या वाढत्या किंमतींमुळे तयार घरं विकली जात नाहीत, त्यामुळे बिल्डर लॉबीकडून सातत्याने रेडी रेकनरचे भाव स्थिर राखण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे घरांचे दर स्थिर राहिल्यास बिल्डर आणि गृहखरेदी इच्छुकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close