पुण्याची अल्पवयीन मुलगी इसिसच्या संपर्कात ?

December 17, 2015 10:17 PM0 commentsViews:

sdsdsada

17 डिसेंबर : इराक आणि सीरियात हिंसाचाराचे तांडव माजवणार्‍या ISIS या दहशतवादी संघटनेने तरुणाईला भुरळ घातली आहे. या संघटनेच्या जाळ्यात पुण्यातील एक शालेय मुलगीही अडकली. ISIS मध्ये जाणार्‍या या मुलीची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ला खबर लागली आणि त्यांनी तिला या नेटवर्कमधून बाहेर काढल आहे. पुण्यात संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

पुण्यातील इंग्रजी माध्यमातील शाळेत ही 16 वर्षांची मुलगी शिकतेय. राजस्थानमध्ये अटक केलेल्या आयओसीमधील इंजिनीयरकडून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई झाली आहे. या मुलीला ISIS या दहशतवादी संघटनेत सुसाइड बॉम्बर बनवण्यात येणार होते. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क करण्यात आला होता. इंजिनीयरने सोशल नेटवर्किंग साईटवर वेगवेगळे ग्रुप बनवले होते. त्यात या मुलीचा रेफरन्स मिळाला. तिच्या ऍक्टिव्हिटीवर गुप्तचर यंत्रणांनी पाळत ठेवली होती. त्यानंतर या मुलीला शोधून एटीएस ने तिच काऊन्सलिंग केली आणि तिला ISISमध्ये जाण्यापासून रोखलं. यापूर्वी ठाणे, कल्याणचे तरुण ISIS या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आले होते. त्यातील एक जण सध्या एटीएसच्या ताब्यात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close