कॅन्सरवर मात करत नाशिकच्या नमिता कोहक ठरल्या मिसेस युनिव्हर्स

December 17, 2015 5:31 PM0 commentsViews:

17 डिसेंबर : इच्छा शक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो, हे शक्य करून दाखवलंय नाशिकच्या नमिता कोहक या महिलेनं. या महिलेनं हाँगकाँग इथं झालेल्या ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाईल्ड क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विषेश म्हणजे कॅन्सरशी लढा देत असताना त्यांनी हा किताब मिळवला.

केवळ विवाहित महिलांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत त्यांनी हे यश मिळवलं आहे. या स्पर्धेतल्या ‘ग्लोरी ऑफ ट्रेडिशन’ म्हणजे ‘सर्वोत्कृष्ट पारंपरिक पोषाख’ या प्रकारात राजवस्त्र पैठणी नेसून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय रॅम्पवर रॅम्पवॉक नमिता यांनी केला. जगभरातील 28 देशांमधील महिला स्पर्धकांनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र त्या सर्वजणींना मागे टाकत सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर नमिता यांनी मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाईल्ड क्वीनचा किताब पटकावला. त्यांच्या या खडतर प्रवासात साथ दिली ती त्यांच्या पती पारितोषिक कोहक यांनी. कोहक यांच्या विवाहाला 15 वर्षे झाली आहेत. नमिता सध्या कॅन्सरशी झगडत असून केमोथेरपीचे उपचारही त्या घेत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close