मोटरमनचा संप, प्रवासी संतापले

February 17, 2010 2:10 PM0 commentsViews: 5

17 फेब्रुवारी मुंबईतील लोकल ट्रेनच्या मोटरमन्सनी आज पुन्हा एकदा मुंबईकरांना वेठीस धरले. ऑफिस सुटताना ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने आंदोलन केले. त्यामुळे अनेक लोकल रद्द झाल्या. आणि प्रवाशी संतापले. मग चर्चगेट स्टेशनवर अर्धा तास अडकून पडलेल्या महिला प्रवासी चक्क ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसल्या.दोन मोटरमनला निलंबित केल्याने मोटरमन अचानक संपावर गेले. त्यामुळे हा खोळंबा झाला होता. रेल्वे प्रशासनाने मग मुंबई सेंट्र्‌ल आणि दादरवरून गाड्या सोडल्या. लोकल वाहतूक आता पूर्वपदावर आली असल्याचे पश्चिम रेल्वेचे पीआरओ श्यामसुंदर गुप्ता यांनी सांगितले.

close