जायकवाडीचं पाणी अडलं, कोर्टाने दिले आदेश

December 18, 2015 9:02 AM0 commentsViews:

jaikwadi dam_water18 डिसेंबर : उच्च न्यायालयाच्या आदेशाशिवाय जायकवाडीला पुढच्या टप्याचं पाणी सोडता येणार नाही असा आदेशच उच्च न्यायालयाने दिला आहे. जायकवाडी धरणाला भंडारदरा आणि मेवुंडे धरणाचं 2.4 टीमसी पाणी सोडायला न्यायालयाने यापूर्वी नकार दिला होता.

जायकवाडी धरणाला पाणी सोडण्यात यावं यासाठी गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली याबद्दल माहिती घेतांना न्यायालयाने सरकारी वकीलांकडे जायकवाडी धरणाच्या वरच्या आणि खालच्या धरणातील पाण्याच्या पातळीची आकडेवारी मागितली होती. ती मात्र वकिलांकडे नव्हती म्हणून याच मुद्याला आक्षेप घेत न्यायालयाने जायकवाडीत पुढच्या टप्प्याचं पाणी सोडायला नकार दिला आहे. 14 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close