गोवंश हत्या बंदी ही कुणी काय खावं किंवा खाऊ नये यासाठी नाही -अणे

December 18, 2015 9:11 AM0 commentsViews:

Aney12318 डिसेंबर : गोवंश हत्या बंदी कायदा हा दुभत्या जनावरांचं रक्षण करण्यासाठी आहे, कुणी काय खावं किंवा खाऊ नये हे ठरवण्यासाठी नाही अशी भूमिका राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी हायकोर्टात मांडली.

राज्य सरकारने केलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यावर अणे यांनी ही भूमिका मांडली. एखाद्या व्यक्तीकडे गोमांस असलं तर त्याला अटक होऊ शकते ही गोष्ट खरी असली तरी हा या कायद्याचा परिणाम असून त्याचं मूळ उद्दिष्ट नाही असंही अणे यांनी म्हटलं.गोमांस बाळगणे हे राज्यातल्या कायद्यानुसार गुन्हा आहे. हे बाहेरून आलेल्या बीफलाही
लागू पडतं असं अणे म्हणाले. कायद्याचा दुरुपयोग होतो म्हणून कायदा रद्द करता येणार नाही अशी भूमिका अणेंनी मांडलीे. या प्रकरणाची सुनावणी आजदेखील सुरू राहणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close