‘बाजीराव मस्तानी’विरोधात भाजप रस्त्यावर, पुण्यात शो रद्द

December 18, 2015 9:54 AM0 commentsViews:

bjp pune bajirao mastani18 डिसेंबर : ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला होता आणि आज प्रदर्शनाच्या दिवशीही सुरूच आहे. पुण्यात भाजपने या सिनेमाला विरोध केलाय. त्यामुळे शहरातील सिटी प्राईड मल्टीप्लेक्समध्ये दिवसभरातील सर्व शो रद्द करण्यात आहे. तर पिंपरी चिंचवडमधीलही सिटी प्राईडमधील सकाळचे शो रद्द करण्यात आले आहे.

बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं ‘पिंगा’ आणि ‘जय मल्हारी’ हे गाणं इतिहास विरोधी असल्यानं ती चित्रपटातून वगळण्यात यावी अशी मागणी करत भाजपनं पुण्यात चित्रपटाला विरोध केलाय. गाणी वगळल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही असा इशारा भाजपनं दिला आहे. एवढंच नाहीतर आज प्रदर्शित होणारा हा सिनेमा आम्ही बंद पाडू असा इशारा भाजपनं दिलाय. म्हणून पुण्यातील सिटी प्राईड मल्टीप्लेक्स या सिनेमाचे सकाळचे तीन शोज रद्द करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे.

विशेष म्हणजे हे तीन शोज हाउसफुल्ल होते. परंतू शोज रद्द केल्यामुळे थिएटर मालकांनी सगळ्या प्रेक्षकांना त्यांचे तिकीटाचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतलाय. परंतू भाजपच्या आंदोलनाच्या इशार्‍यामुळे या थिएटर मालकांनी पोलीस संरक्षणाची मागणी देखील केलीये. त्यामुळे   कोथरूड येथील सिटीप्राईडबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे अखेर सिटी प्राईडमधील बाजीराव मस्तानीचे सर्व शो रद्द केले आहे.  तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील सकाळचे तीन शोही रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे शहरातील इतर ठिकाणी शो सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close