स्फोटासाठी रिमोटचा वापर; स्थानिक तरूणांचाही सहभाग

February 17, 2010 2:29 PM0 commentsViews: 4

17 फेब्रुवारीपुण्यातील जर्मन बेकरीमधील स्फोट रिमोट कंट्रोलने घडवून आणला असावा, शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी ही शक्यता वर्तवली आहे. या स्फोटामध्ये स्प्लिंटर्सचा वापर झाला नसल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले आहे. अधिक तपासासाठी NIAचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. तसेच एनएसजीची एक टिमही पुण्यात दाखल झाल्याचे त्यांनी सांगीतले.स्थानिकांची मदतपुण्यातल्या 3 ते 4 तरूणांनी बॉम्बस्फोटात सक्रीय सहभाग घेतल्याचे पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. जर्मन बेकरीचे महत्त्व दहशतवाद्यांच्या लगेचच लक्षात येणे शक्य नाही. त्यामुळे पोलीसांनी गेले चार दिवस केलेल्या तपासात स्फोटात स्थानिकांचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. स्फोटात भाग घेतलेले तरूण पुणे शहरालगतच्या परिसरातील आहेत. यापैकी दोघे विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांचे सहकार्य यापूर्वी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेच्या आसिफ बशीर शेख, मोहम्मद मन्सूर अजगर पिरबॉय, मुबीन कादर शेख उर्फ सलमान, दस्तगीर फिरोज मुजावर उर्फ अफरोज उर्फ मुजीम यांच्यासह 11 अतिरेक्यांना पुणे शहर आणि परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. या दुव्याचाही एटीएसने तपासात वापर केला आहे.

close