झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचा निर्धार

February 17, 2010 3:04 PM0 commentsViews: 7

17 फेब्रुवारी शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सरकारने महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प सोडला आहे. या आणि इतर योजनांची माहिती देणार्‍या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रेझेंटेशन आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले. एकूण 16पैकी 4 मंत्र्यांनी आज व्हिजन डॉक्युमेंट प्रेझेंटेशन केले. जलसंपदा, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, सामाजिक न्याय, माहिती तंत्रज्ञान आणि कृषी विभागाने घेतलेले निर्णय , तसेच भविष्यातले निर्णय आणि अपेक्षित बदल याविषयी बैठकीत माहिती दिली. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून देण्यात आलेल्या या माहितीवर सर्व मंत्री आणि सचिवांची मते, हरकती नोंदवण्यात आल्या.झोपडीधारकांना पक्की घरेव्हिजन डॉक्युमेंटमध्ये झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राची संकल्पना राबवण्यात आली आहे. मुंबई आणि इतर शहरांतील 10 लाख अनधिकृत झोपडीधारकांना पक्की घरे, तर 22 लाख लोकांना 20 बाय 20 चे प्लॉटस् देण्याची सरकारची योजना आहे. तसेच दारिद्रय रेषेखालच्या 70 लाख कुटुंबांची संख्या 30 लाखांनी कमी करण्याचं ध्येय आहे. सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यासाठी अनुदानाच्या रकमेत वेळोवेळी वाढ करण्यात येणार आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न दुपटीनं वाढवण्यासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना हाती घेतल्या जाणार आहेत. सध्या असलेली 16 टक्के सिंचन क्षमता 22 टक्क्यांपर्यंत वाढवणं, 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त करणं तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवणं यासाठी महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या जाणार आहेत. चौपदरी रस्ते सध्या 35 पैकी 23 जिल्हे चौपदरी रस्त्यांनी जोडले आहेत. उर्वरित 12 जिल्ह्यांनासुद्धा चौपदरी रस्त्यांनी जोडले जाणार आहे. याशिवाय मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातली एमएमआरडीएची 1 लाख 13 हजार कोटी रुपयांची कामे जलद गतीने पूर्ण केली जाणार आहेत.कृषी विद्यापीठांना सहावा वेतन आयोग आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेळीमेंढी विकास महामंडळाला पाचवा वेतन आयोग लागू करण्यात आला. यासोबतच धुळे आणि तासगावमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.मुंबई मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

close