बाजीराव मस्तानी चांगला सिनेमा, प्रेक्षक म्हणून आवडला -अमृता फडणवीस

December 18, 2015 1:23 PM0 commentsViews:

amruta fadanvis18 डिसेंबर : बाजीराव मस्तानी सिनेमाच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. पुण्यात काही ठिकाणी शोही बंद पाडले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गुरुवारीच हा सिनेमा पाहिला आणि प्रेक्षक म्हणून हा सिनेमा आपल्याला आवडला अशी प्रतिक्रिया आयबीएन लोकमतकडे दिली.

अमृता फडणवीस म्हणतात, बाजीराव मस्तानी हा सिनेमा मी पाहिला. एक प्रेक्षक म्हणून हा सिनेमा मला चांगला वाटला. आता जो काही वाद सुरू आहे त्याचा अभ्यास म्हणा किंवा तुलना अशी काही मी केली नाही. पण, एक सिनेमा म्हणून बाजीराव मस्तानी चांगला सिनेमा आहे. फक्त मनोरंजन म्हणून त्या चित्रपटाकडे पाहिलं. जर तुम्ही इतिहास म्हणून जर विचारात असेल तर माझं असं कोणतंही मत या सिनेमाबद्दल नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे कार्यकर्ते सिटी प्राईड थिएटरमध्ये आंदोलन करत आहे. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सिनेमा पाहिला आणि तो त्यांना आवडला आहे. तर तुम्ही आता वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन करणार का ? असा सवाल केला असता भाजपचे कार्यकर्ते अगोदर गोंधळून गेले. पण, दुसर्‍याच क्षणी सावरत आमचा प्रेक्षकांना विरोध नाही, सिनेमातील गाण्यांना विरोध आहे असं जाहीर करून टाकलं. एकंदरीतच एका प्रकार भाजप कार्यकर्त्यांची स्टंटबाजी या निमित्ताने समोर आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close