‘बाजीराव मस्तानी’चा मार्ग मोकळा, हायकोर्टाने याचिका फेटाळली

December 18, 2015 1:57 PM0 commentsViews:

court on BM18 डिसेंबर : बाजीराव मस्तानीमधील ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ गाण्यावर आक्षेप घेत भाजपसह इतर संघटनांनी कडाडून विरोध केलाय. मात्र, दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने बाजीराव मस्तानीला हिरवा कंदील दिलाय. या सिनेमावर बंदी घालावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती ती कोर्टाने फेटाळून लावलीये.

बाजीराव पेशवेंच्या जीवनपटावर आधारीत संजय लीला भन्साली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी सिनेमा आज प्रदर्शित झालाय. पण, या सिनेमात पिंगा या गाण्यात मस्तानी आणि काशीबाईंनी एकत्र नृत्य करत असल्याचं दाखवण्यात आलं. तसंच मल्हारी या गाण्यात बाजीराव यांनी ठेका धरलाय. या दोन गाण्यांमुळे मस्तानी आणि पेशव्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतलाय. या प्रकरणी हेमंत पाटील यांनी या सिनेमावर बंदी घालावी अशी मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, हायकोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बाजीराव मस्तानीचा मार्ग मोकळा झाला असून आज सर्वत्र आधीच तो प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तानीसाठी आता सिनेमागृहांचं दार बंद होणार नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close