पाकिस्तानशी चर्चा होणारच

February 17, 2010 5:16 PM0 commentsViews: 3

17 फेब्रुवारी 26/11 हल्ल्यानंतर जवळपास 14 महिन्यांनी भारतावर अतिरेकी हल्ला झाला. पुण्यातील कोरेगाव पार्कातील स्फोटाच्या संशयाची सुई लष्कर-ए-तोयबा आणि इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनांकडे आहे. त्यावरून पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचललेली नाहीत, हे स्पष्ट होत आहे. असे असलं तरी पाकिस्तानशी या महिनाअखेर होणारी सचिवस्तरीय चर्चा मात्र रद्द न करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पण ही चर्चा आता सर्वसमावेशक नसून दहशतवादावर केंदि्रत असेल, असे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी 'आयबीएन नेटवर्क'शी बोलताना स्पष्ट केले आहे.भारतावर होणार्‍या अतिरेकी हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानकडे वारंवार चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अतिरेक्यांविरोधात पाकिस्तान सरकारने कडक पावलं उचलावीत, अशी मागणी आता भारत नव्याने करणार असल्याचे कृष्णा यांनी सांगितले आहे

close